Congress puts pressure on Thackeray faction ahead of MLC elections. Saam Tv
महाराष्ट्र

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

MLC Election: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठाकरे गटासमोर एक मोठी अट ठेवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • विधानपरिषद निवडणुकीआधी काँग्रेसनं ठाकरे गटासमोर अट ठेवली आहे.

  • विविध पक्षांकडून उमेदवारी आणि जागावाटपासाठी रणनीती आखली जात आहे.

  • जागावाटपावरून वाद वाढण्याची चिन्हे

काँग्रेसनं महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष ठाकरे गटाला पेचात पाडलंय. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक पार येत्या काही काही दिवसात पार पडणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नेत्यांकडून उमेदवारींसाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्याचदरम्यान राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी हाती आली आहे. मविआतील काँग्रेसनं ठाकरे गटाला समोर उमेदवारीसाठी मोठी अट ठेवली आहे.

उद्धव ठाकरे गटाला काँग्रेसचा पाठिंबा असेल तर ठाकरे गटानं काँग्रेसची अट मान्य करावी अशी मागणी विजय वडेवट्टीवार करत आहेत. विधान परिषदेची निवडणूक १२ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशीच निकाल जाहीर केला जाणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ६, शिवसेना २, राष्ट्रवादीला १ आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे.

या एका जागेसाठी महाविकास आघाडीकडून अद्याप निर्णय झाला नाहीये. मविआतून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये. परंतु मविआतून उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे.अशातच आता या एका जागेबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर संधी मिळणार असं बोललं जातंय. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनीही भाष्य केले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण त्याबरोबरच पुढील राज्यसभा येणार आहे, त्यावरही चर्चा झाली पाहिजे.

उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करूच, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे तर ती काँग्रेसला सोडण्यात यावी अशी आमची मागणी आहे. याबाबत आमची आज प्रदेशाध्यक्षांची चर्चा झाली ते उद्धव ठाकरेंनी भेटून आलेत. आमच्या आघाडीत समन्वय राहावा या दृष्टीने हे निर्णय होणे अपेक्षित आहे ती चर्चा आम्ही करत आहोत.

दरम्यान आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मविआतील घटकपक्ष म्हणून आमच्यात संवाद झाला आहे. भविष्यातील आव्हानांवरही आम्ही चर्चा केली. येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करतील आणि विधानपरिषदेविषयी निर्णय घेण्यात येईल. तसेच उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत आमची भूमिका तुमच्या सर्वांसमोर आहे, असं सपकाळ माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT