Eknath Khadase Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

Eknath Khadase: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Priya More
  • भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट घेतली

  • या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले

  • भेटीनंतर खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू

  • खडसे यांनी ही भेट वैयक्तिक असल्याचे सांगत कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचे नाकारले

संजय महाजन, जळगाव

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली. मुंबईत या दोघांची भेट झाली असून बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

भाजपचे दिग्गज नेते विनोद तावडे यांनी आमदार एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांची भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता एकनाथ खडसे हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतांनाच आता एका भेटीमुळे याला मोठे बळ लाभले आहे.

दरम्यान, या संदर्भातील नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, विनोद तावडे हे रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी माझ्या मुंबई येथील निवासस्थानी आले होते. तेव्हा त्यांनी माझी देखील भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून वैयक्तीक वार्तालाप झाला ! असे आमदार खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्या भेटीमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल होण्याची चर्चा होत आहे. या भेटीमागे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचा प्रभव कमी करण्याची दिल्लीतून खेळी तर केली जात नाही ना अशा देखील उलट-सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. गिरीश महाजन यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाची ही चाल असल्याचे देखील बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT