Harshvardhan Patil Criticized Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मी पहाटे उठून कुठे जात नाही, हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांवर बोचरी टीका

Harshvardhan Patil Criticized Ajit Pawar: टमहाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात कोणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजितदादांनाचं आहे.' , अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली.

Priya More

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उपरोधिक टीका केली. 'अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात कोणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजितदादांनाचं आहे.' , अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार इंदापुरात आले होते. यावेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर जाहीर सभेत जोरदार टीका केली. या टीकेला आता हर्षवर्धन पाटलांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

'अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात जाऊन कोणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजितदादांनाचं आहे. त्यांनी रोज इंदापुरात यावं टीका करावी मी स्वागतच करतो. मी काय पहाटे उठून कुठे जाणारा नाही आमचा कारभार जनतेतून चालतो.' अशी खोचक टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: जागांचा निर्णय होण्याआधीच अबू आझमी यांचं मविआसंदर्भात मोठ विधान

CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट

Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : काँग्रेसच्या चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra Election: शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; मिलिंद देवरा देणार आदित्य ठाकरेंना टक्कर, कोणाला मिळाली संधी? वाचा

SCROLL FOR NEXT