Sujit Zaware joins Shiv Sena in the presence of Deputy CM Eknath Shinde. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Ahilyanagar Politics: सुजित झावरे यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडलाय. दरम्यान याआधीही त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. निवडणुका झाल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले होते.

Bharat Jadhav

  • सुजित झावरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का.

  • अजित पवार यांच्या पक्षात डावललं जात असल्याचा आरचोप सुजित झावरे यांनी केला.

  • एकनाथ शिंदे आज अहिल्यानगरमधील पारनेर दौऱ्यावर आहेत.

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

अहिल्यानगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी घड्याळ सोडून हाती धनुष्यबाण घेतले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्याला शिवसेनेनं आपल्या गोटात आणल्यानं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय.

निवडणूक आयोगाकडून दोन दिवसांपूर्वी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी पक्षांतराच्या घटनांना वेग आलाय. राजकीय पक्ष आली ताकद वाढवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात ओढून आणत आहेत.

महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर महायुतीमधील पक्षदेखील एकमेकांचे नेते फोडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगरमधील पारनेर दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार गटाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. सुजित झावरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. सुजित झावरे यांचे वडील दिवंगत वसंतराव झावरे हे पारनेर तालुक्याचे माजी आमदार होते.

अंतर्गत वादामुळे झावरेंनी शिवसेनेची वाट धरली

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी सुजित झावरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांना पारनेर मतदारसंघातून आमदारकीच तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र भाजपने तिकीट न देता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली. त्यामुळे झावरे यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे काम केले होते. पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांचा विजय झाला. त्यानंतर सुजित झावरे आणि आमदार काशिनाथ दाते यांच्यात काही कामावरून खटके उडू लागले. अखेर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजित झावरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पारनेर तालुका हा शिवसेनेचा काही काळ बालेकिल्ला होता. तो पुन्हा हातात घेऊ, असा विश्वास सुजित झावरे यांनी प्रवेशापूर्वी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीच्या वसमत रोडवर धावत्या ऑटोला आग, काही क्षणात वाहन जळून खाक

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity Bill Mumbai: विज बील होणार स्वस्त, ग्राहकांसाठी नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT