Eknath Shinde welcomes former Solapur Congress leader Ramesh Hasapure into Shiv Sena during a party induction programme in Mumbai. SaamTV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला; सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Solapur Politics : सोलापूरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेश हसापुरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला यामुळे मोठा फटका बसला आहे.

Bharat Jadhav

  • सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

  • एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पक्षप्रवेश मोहिमेला वेग आला आहे.

  • मुंबई, नांदेड, पालघर, सातारा आणि ठाणे येथील अनेक पदाधिकारीही शिवसेनेत दाखल झाले.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात नेत्यांच्या इनकमिंगचा धडाका सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र असो की, विदर्भ की मग कोकण सर्वत्र पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम चालू आहेत. आपला पक्ष मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली आहे. विविध भागातील नेत्यांना इतर पक्षातील प्रभावी राजकीय पुढारी ते आमदारांना गळाला लावण्याचे आदेश देण्यात आलेत. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी आज ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला आहे.

मुंबईसह नांदेड, सोलापूर, पालघर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात सर्वात मोठा धक्का काँग्रेसला लागला आहे, सोलापुरातील मातब्बर नेता शिंदे गटाच्या गळाला लागला असून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रमेश हसापुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रमेश हसापुरे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठे नेते असून यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. मागील अनेक वर्षापासून ते काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होते.

मात्र आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, या प्रवेशामुळे दक्षिण सोलापुरातील काँग्रेस संघटनेला मोठा धक्का मानला जातोय. रमेश हसापुरे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदेंनी प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यभरातून शिवसेनेत प्रवेशाचा ओघ सातत्याने सुरू असून हा पक्षाच्या विचारांवरील आणि नेतृत्वावरील वाढत्या विश्वासाचा पुरावा असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

उबाठा गटाचे वरळीतील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी, उपशाखा संघटक मीना पाथरे, रजनी कोळी, प्रतिभा दळवी, नांदेड जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि अखिल भारतीय कैकाडी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश हसापूरे, पालघर जिल्ह्यातील उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागप्रमुख प्रवीण गवळी, संतोष महाले, योगेश भानुशाली, मालती गवळी आणि अनेक सरपंच उपसरपंच, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राम बनसोडे, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष भैरवनाथ वाघमारे, सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते तसेच असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्राच्या विकासातही मोदींचे मोठे योगदान - एकनाथ शिंदे

मुलांच्या टिफिनची झंझट मिटली! अवघ्या 5 मिनिटांत बनवा 'हे' 5 चविष्ट पदार्थ

Beed Boat Accident: अधिकमासात गोदावरीत ३५ भाविकांची बोट उलटली, एका महिलेचा मृत्यू, नदीपात्रात एकच खळबळ

Political News: ममता बॅनर्जींना एका दिवसात 2 धक्के, खासदाराचा राजीनामा अन् विश्वासू व्यक्तीनं घेतला मोठा निर्णय

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

SCROLL FOR NEXT