Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा झटका, बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : भाजपने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे. नंदुरबारमधील बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते संतोष पाटील यांनी पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  • पाटील हे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय असून, स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो.

  • या प्रवेशामुळे नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाला आणि रघुवंशी यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकीच्या आधी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाचे नंदुरबारमधील नेते संतोष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय होते. भाजपचे आमदार विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत संतोष पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. या पक्षप्रवेशामुळे नंदुरबारमध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसला असल्याचे म्हटले जात आहे.

मागील ६० वर्षांपासून संतोष पाटील हे रघुवंशी कुटुंबाशी जोडलेले होते. संतोष पाटील हे धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. याशिवाय ते तिलाली गावचे सरपंच आणि विकास सोसायटीचे अध्यक्ष देखील आहेत. नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागामध्ये संतोष पाटील यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते.

'रघुवंशी त्यांच्या निकटवर्तीयांना डावलत आहेत, त्यांचे खच्चीकरण करत आहेत. निकटवर्तीयांना ते कोणत्याही कार्यक्रमांमध्ये बोलावत नाही, विश्वासात घेत नाही' असे म्हणत संतोष पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीमुळेच पाटील यांनी शिंदे गटातून बाहेर पडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आरक्षणासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन

Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Grahan Dosh: 6 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या अडचणी वाढणार; 18 वर्षांनंतर राहू-चंद्र बनवणार अशुभ ग्रहण योग

Kendra Yog 2025: 3 सप्टेंबरपासून 'या' राशींना मिळणार प्रत्येक कामात यश; बुध-युरेनस बनवणार पॉवरफुल योग, पैसाही येणार

Raj Thackeray: ना आमदार ना खासदार तरीही राज ठाकरेंच्या घरचा गणपती ठरलाय वजनदार; कसा? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT