Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आसनावर ठेवला, विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

Mahavikas Aghadi Vs Mahayuti: विरोधक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन सभागृहात आले आणि त्यांनी आंबेडकरांचा फोटो आसनावर ठेवला. त्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले.

Priya More

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून काँग्रेससोबत विरोधक आक्रमक झाले आहेत. आजही विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरोधक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन सभागृहात आले आणि त्यांनी आंबेडकरांचा फोटो आसनावर ठेवला.

विरोधकांच्या या कृतीमुळे सभागृहामध्ये गोंधळाचे वातावरण होते. या कृतीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. गुरूवारी मुंबईमध्ये काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाला. काँग्रेस नेत्यांच्या फोटोंवर शाईफेक झाली. हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी विरोधकांच्या आसनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आवाहन केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आमचा देखील हक्क आहे. बाबासाहेब आंबेडकर फक्त तुमचेच आहेत का? तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावत आहात. तर आमच्याही बाकावर फोटो लावा.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आसनावर लावण्याची परवानगी द्यावी असे आवाहन भाजप आमदाराने केले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी गोंधळ घातला. या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT