Maharashtra Politics 2024  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाराज छगन भुजबळ दादांची साथ सोडणार? कार्यकर्त्यांचा भाजपात जाण्याचा आग्रह

Chhagan Bhujbal On NCP: महायुती सरकार बहुमतानं सत्तेत आलं. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीचा सूर उमटला. यात सर्वात मोठे नेते छगन भुजबळ हेसुद्धा नाराज आहेत.

Girish Nikam

मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नुसते नाराज नाही तर संतापलेत. नाशिकमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. त्यांचा रोख अजित पवारांच्या दिशेने आहे. यावेळी समर्थकांनी भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा असा आग्रह धरलाय. त्यामुळे भुजबळांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पाहूया एक रिपोर्ट.

ऐकलंत ना...ओबीसींचा बुलंद आवाज काय म्हणाला ते. महायुती सरकार बहुमतानं सत्तेत आलं. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीचं पेव फुटलं. यात नाराज असलेले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी तर थेट नेतृत्वाविरोधात उघ़डपणे दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे आपल्या मंत्रिपदासाठी फडणवीसही आग्रही होते असं सांगत भुजबळांना भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय. की काय अशी चर्चा सुरू झालीय.

त्यात आणखी नाशिकच्या मेळ्याव्याची भर पडलीय. कारण सलग तिसऱ्या दिवशी नाराज भुजबळांनी आपलं होम ग्राऊंड असलेल्या नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले यात त्यांच्या कार्य़कर्त्यांनी थेट त्यांना भाजपात जाण्याची गळ घातली. नाराज असलेल्या भुजबळांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर उघ़ड पणे निशाणा साधल्यामुळे आता पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय. भुजबळांशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाईल अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलीय.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगला होता. मराठा-ओबीसी असं उघड संघर्ष पहायला मिळाला. भुजबळांनी ओबीसी मेळावे घेत जरांगेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय होतं. मात्र सत्ता मिळाल्यानंतरही भुजबळांसारख्या हेवी वेट नेत्याला डावलण्यामागे अजित पवारांचं काय गणित आहे? हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र या नाराजीतून नवीन वर्षात भुजबळ राजकीय ट्रॅक बदलणार की त्यांच्याकडे दुसरी कोणती तरी मोठी जबाबदारी देणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT