Devendra Fadnavis on Thackeray MP defection saam tv
महाराष्ट्र

ठाकरेंचे खासदार फोडण्यात फडणवीसांचा हात? MPच्या बंडखोरीस जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ऑपरेशनचं राजकारण

Devendra Fadnavis On Operation Tiger Row : ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंड का केलं? ऑपरेशन टायगरच्या मागे कोणाचा हात आहे, या चर्चांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bharat Jadhav

  • सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली

  • या संपूर्ण घडामोडींना 'ऑपरेशन टायगर' असे नाव देत राज्यभर चर्चा सुरू आहे.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत या आरोपांवर आणि राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटातील खासदारांना गळाला लावलं. खासदारांच्या बंडाळीची चर्चा अख्खा देशात चर्चेत आली. मात्र सगळ्या घडामोडीमागे भाजप असल्याची चर्चादेखील आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदेंना यासाठी मदत केल्याचं सांगितलं जातंय. यावर मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत आपल्या भूमिका मांडली आहे.

एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगरला कोणाची मदत झाली? ठाकरेंचे खासदार का फुटले? बंडाळीमागे कोण जबाबदार याची उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत.

खासदार फोडण्यामागे फडणवीसांचा हात?

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीतील प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, जेव्हा कधी अशा प्रकारचे काही ऑपरेशन होतात. त्यात काय होतं, कोणी केलं. कसे केले या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. पण शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला भाजपचा पाठिंबा आहे. कारण ते आमच्या मित्रपक्षाने केलंय. त्यांना जी आवश्यकता पडली, ती मदत ही आमचा मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांना केली. याव्यतिरिक्त अधिक माहिती देणं राजकारण्याकरिता योग्य नसल्याचं फडणवीस म्हणाले.

खासदार फुटण्यासाठी जबाबदार कोण?

ठाकरे गटातील सहा खासदारांनी निधीचे कारण देत बंड केले. फंड नसल्यानं विकासकामे होत नसल्याचं सर्व खासदारांनी सांगितलं. निधीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना देखील या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, निधीचे कारण हे अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकते. कारण निधीचा अर्थ केवळ निधीपुरता मर्यादित नसतो. काही प्रोजेक्ट्स असतात.

काही वेगवेगळ्या पायाभूत सुविधांचे विषय असू शकतात. काही सामाजिक विषय असतात. काही कार्यालयीन असतात, म्हणजेच आपण विरोधात असतो त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो." निधीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी आपलं स्वत: चे मत मांडले, म्हणाले कोणीही सत्ता पक्षात असतो तेव्हा आपल्या आमदार-खासदारांना थोडा जास्त मिळाले पाहिजे, असा प्रयत्न असतोच. पण, हे एकमेव कारण असावं.

खासदार का फुटले?

ठाकरेंचे खासदार फुटण्यामागील आणखी एक कारण मुख्यमंत्र्यांनी दिलंय. राजकारणात प्रत्येकजण भविष्य पाहत असतो. त्याच्या लक्षात आलं की, ज्या नेतृत्वाखाली मी काम करतोय, ते माझे भविष्य सुरक्षित करू शकत नाहीत. त्यावेळी तो वेगळा विचार करत असतो. तसेच सत्ता आली पाहिजे असा विषय नसतो. परंतु माझ्याकरिता किंवा त्या विषयाकरिता आम्ही आहोत. त्याकरता पक्षनेतृत्व लढाई करत आहे का? त्याच्यामध्ये काही कष्ट घेत आहेत का?

अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर नेते दुसरा विचार करतात. पण सत्ता मिळवण्यासाठी काही लढाई केली जात नसेल आणि हे जर नेहमीप्रमाणे चालत असेल, तर याचा अर्थ असा की तिथे पुढे भविष्य नाही. मग जिथे भविष्य असेल, तिथे नेते जाण्याचा प्रयत्न करत असतात" देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

Friday Horoscope: प्रेमात नवा रंग, पैशांचा वर्षाव; या ५ राशींना मिळणार चांगली बातमी, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Blood Pressure : सकाळी की रात्री? BP ची गोळी कधी घेतल्याने जास्त फायदा होतो, जाणून घ्या

Pune Crime: जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून गोळीबार; पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त

khashaba: राजकारणातून थेट चित्रपटात...; नेत्यानं साकारली पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका, मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, VIDEO

SCROLL FOR NEXT