Dhananjay Munde Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीमंडळात? मुंडेंचा राजीनामा ही धुळफेक?

Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सरपंच हत्या प्रकरणामुळे मुंडेंची हकालपट्टी केल्याची चर्चा आहे. मात्र मुंडेंचा हा राजीनामा धूळफेक आहे का असा सवाल उपस्थित होतोय. पाहूया याबाबत रिपोर्ट.

Snehil Shivaji

Dhananjay Munde Resign : सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराडशी जवळीक, अवादा कंपनी खंडणी प्रकरण, पीक विमा घोटाळा प्रकरण आणि कौटुबिंक हिंसाचार प्रकरण असे एक ना अनेक प्रकरणं चर्चेत आल्यानं अखेर धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं जाहिर करत मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी आरोपांची राळ उठवली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला मुंडेंचा राजीनामा ही केवळ धुळफेक असून तात्पुरती अँडजस्टमेंन्ट असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.नेमके काय आरोप आहेत पाहूया.

हवा गरम आहे; शांत रहा.

- मुंडेच्या गुंडांनी औरंगजेबी पद्धतीनं संरपंचाना मारलं, त्यामुळे मुंडेंची हकालपट्टी व्हायला हवी होती

- मुंडेंची राजीनामापत्रातील भाषा म्हणजे नैतिकतेची थट्टा म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा ही धुळफेक असून अँडजस्टमेंन्ट आहे

- हवा गरम आहे. मामला थंड होई पर्यंत आराम करा. नंतर पुन्हा मंत्रीमंडळात घ्यायचं पाहू असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

- पुन्हा मंत्रीमंडळात घ्यायचं असं अजित पवार आणि फडणवीसांमध्ये ठरलं मग हा राजीनामा दिला

संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोंनी महाराष्ट्र सुन्न झाला. त्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर विरोधकांनी मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली. या आरोंपांनुसार जर धनंजय मुंडेंवरची ही तात्पुरती कारवाई असेल आणि प्रकरण थंड झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याचा विचार करत असेल तर मात्र सरकार स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतयं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

Mahayuti Manifesto: लाडकींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट; मुंबईकरांसाठी महायुतीकडून घोषणांचा पाऊस

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

SCROLL FOR NEXT