मनोज जरांगें आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही महिन्यांपासू वाक् युद्ध सुरू आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. छगन भुजबळ आणि मनोज जरांगें पाटील दोघांनींही एकमेकांवर जहरी टीका केली होती. दरम्यान भुजबळांच्या त्या धारधार टीकेवरून आज पंढपुरातील क्रार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. कार्यक्रम आध्यात्मिक असल्याने छगन भुजबळ यांची वाणी देखील संता सारखी गोड होती. त्यातून बाण कमी आणि अध्यात्म जास्त होतं असं असल्याचं ते म्हणाले.
छगन भुजबळ यांचा ओबीसी नेते असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. सावता महाराजांनी महाराष्ट्राला वेगळा विचार दिला आहे. वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा सावता माळी यांनी संजीवन समाधी घेतली. सावता माळी यांनी, कर्मयोग सांगितला. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम त्यांनी केलं. समाजातील विविध लोकांना एकत्रित आणून सामाजिक भाव जागृत झाला पाहिजे, समाज एकसंघ राहावा अशा प्रकारचा विचार 800 वर्षांपूर्वी त्यांनी दिला, असे उद्गारही त्यांनी काढले.
समाज समतावान असला पाहिजे. अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे, असा विचार सावता माळी यांनी मांडला. पंढरीचे विठुराया त्यांच्या दर्शनासाठी आले भक्तीची ही खरी शक्ती आहे. आपली भक्ताची काळजी घेणारे विठु माऊली सावता महाराज यांच्या मळ्यात आली. त्यामुळे ज्या ठिकाणीहून अंकुर फुटला तिथे विकास झाला पाहिजे. त्यामुळे अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्रा दर्जा देण्यात येत असून शंभर कोटींचा निधी राखून ठेवला जाईल.
समाजा समाजामध्ये भेद आणि दुही निर्माण होत असताना, काही ज्येष्ठ राजकीय नेते मंडळी मूग गिळून गप्प आहेत, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज माढा तालुक्यातील अरण येथे संत सावता माळी भक्त निवास आणि वास्तू शिल्प भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी आरक्षण मागणीवरून ओबीसी-मराठा वादावर बोलताना ही टिका केली.
जगावर परकीय आक्रमण झाली तरीही संतांच्या विचारामुळे आपली संस्कृती जिवंत राहिली आहे. समाज वेगळे होते, जाती वेगळे होते, तरी त्यांना जोडणारा वारकरी संप्रदाय आणि संत शिकवण मोठी होती. आज महाराष्ट्रा जाती जातीत विसंगत होतोय. संतांच्या विचाराची आज महाराष्ट्राला गरज आहे. मोठ मोठे नेते समाजातील जातींची दूही बघून ही मुग गिळून गप बसले आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.