Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray News  Saam TV
महाराष्ट्र

Fadnavis vs Thackeray : "काय होतास तू, काय झालास तू, अरे असा कसा वाया गेलास तू..."

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

Satish Daud

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray News : एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसचे नेते आक्षेपार्ह विधान करतात, आणि त्यावेळी आमच्यासोबत वर्षानुवर्ष असलेले आमचे मित्र त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. अन् सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करतात, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. (Breaking Marathi News)

आज नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)  यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मला राहुल गांधी यांच्यावर काही बोलायचं नाही. खरं म्हणजे त्यांच्यावर बोलून मी माझ्या शब्दाची वाफ का वाया घालवू? पण, मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे. अरे काय होतास तू... काय झालास तू... अरे असा कसा वाया गेलास तू..., असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "मला आठवतो तो दिवस. ज्यादिवशी काँग्रेसचा एक नेता मणिशंकर स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशाच प्रकारे माफीवीर बोलला होता आणि पाटी काढली होती. त्यावेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वत: जोडा घेऊन निघाले आणि मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत जोडा मारला होता".

'वारसा जन्माने मिळत नाही तर कर्माने मिळतो'

तुम्ही बाळासाहेबांचं नाव जोडता ना? मग त्यांचे विचार गेले कुठे? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना विचारला. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच विचार आणि कृती सोडून दिली म्हणून आम्हाला आता मैदानाता उतरवावं लागतं आहे. आमच्या एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावं लागत आहे. कारण, वारसा जन्माने मिळत नाही, वारसा कर्माने मिळतो, असं देखील फडणवीसांनी ठामपणे सांगितलं आहे.  (Latest Marathi News)

'राहुल गांधींना सावरकर कळूच शकत नाही'

जोपर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावकरांचा अपमान करत राहतील तोपर्यंत सावरकर गौरव यात्रा तोपर्यंत सुरूच राहिल आणि सावरकरप्रेमी हे या लोकांचा निषेध करत राहतील. स्वातंत्र्यापूर्वी सावकरांना इंग्रजांनी त्रास दिला आणि स्वातंत्र्यानंतर इंग्रज आपले जे एजंट ठेवून गेले होते, त्या एजटांनी त्रास दिला. आजही त्यांचेच विचार घेऊन जे याठिकाणी वागता आहेत ते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना स्वातंत्र्यवीर सावरकर हे कळूच शकत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT