Ajit Pawar Speech  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: आम्हाला कायम निवडून द्या, योजना सुरूच राहतील; अजित पवारांचे जनतेला आवाहन

Ajit Pawar On Government Scheme : अजित पवार आज रांजणगावमध्ये होते. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी सरकारी योजनेची माहिती दिली. आम्हाला निवडून द्या आम्ही योजना आणत राहू असे देखील आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

Priya More

'तुम्ही आम्हाला कायम निवडून द्या, मी कायम योजना सुरु ठेवेल.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित पवार पुण्यातल्या रांजणगावमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारने आणलेल्या योजनांबद्दल नागरिकांना माहिती दिली. त्याचसोबत आम्हाला निवडून द्या आम्ही योजना आणत राहू असे देखील आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

सरकारी योजनांबद्दल बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, 'नागरिक, शेतकरी, महिला, तरुण-तरुणी यांच्यासाठी वेगवेगळ्या चांगल्या योजना या सरकारने आणल्या आहेत. विकास हेच आमचे ध्येय आहे. गरीब समाजाला वर आणण्यासाठी योजना आणल्या. योजना आणण्यासाठी पुढेही तुम्ही सहकार्य करावे. लाडकी बहीण योजनेसाठी महिला अजून रांगा लावत आहेत. त्यांनी काही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.'

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, 'मी शेतकरी आहे. मला शेतकऱ्याचे दुःख माहिती आहे. चास कमानचे पाणी गळती होत आहे. यासाठी डाव्या कालव्याच्या अस्तारिकरणं करण्यात येणार आहे. कोणत्याही जातीपातीचा विचार न करता आम्ही गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. गरीब महिलांना सक्षम करण्यासाठी या योजना आहेत. तुम्ही आम्हाला कायम निवडून द्या. मी कायम योजना सुरु ठेवेल.', असे आवाहन अजित पवार यांनी केले.

अजित पवार यांनी विरोधकांवर टीका देखील केली. त्यांनी सांगितले की, 'आमच्यात धमक आणि ताकद आहे. विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे. पण हा चुनावी जुमला नाही हा अजित पवारचां वादा आणि शब्द आहे. अजित पवार शब्दाचा पक्का आहे.' तसंच, आपल्या वाढदिवसानिमित्त बोलताना अजित पवार म्हणाले की, 'माझ्या आईचे वय झाले आहे म्हणून मी वाढदिवसाच्या दिवशी घरीच थांबत असतो. मात्र आज मी माझ्या आईचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडलोय. अनेक कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यात थांबले होते. म्हणून याठिकाणी यायला उशीर झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT