Ganpat Gaikwad Latest News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'महायुतीत शीतयुद्ध सुरू, जनता त्यांना धडा शिकवेल..' भाजप आमदार गोळीबार प्रकरणावरुन काँग्रेसचे टीकास्त्र

BJP Mla Ganpat Gaikwad Firing: पोलिसाच्या केबिनमध्ये जाऊन तो गोळीबार करणारा सरावलेला गुंड आहे," असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कल्याण गोळीबार प्रकरणावरुन संताप व्यक्त केला.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ३ फेब्रुवारी २०२४

Maharashtra Politics:

कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिल पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर विरोधक आक्रमक झाले असून शिंदे सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

विजय वडेट्टीवार यांची टीका...

"या राज्यात सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशनमध्ये कायदा हातात घेत असतील. तर राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं. कुठे खड्ड्यात घातलाय महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. पोलिसाच्या केबिनमध्ये जाऊन तो गोळीबार करणारा सरावलेला गुंड आहे," असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कल्याण गोळीबार प्रकरणावरुन संताप व्यक्त केला.

तसेच "महाराष्ट्रातील एकूण वातावरण अत्यंत घातक होईल. महायुतीच्या तिन्ही पक्षात कोल्ड वार सुरू आहे. निवडणुका जवळ येतील तसे मारामारी गोळीबार होऊन हे सगळं बघायला मिळेल, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीची घटना होणे म्हणजे पुढच्या काळात काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने बघावे," असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

नाना पटोलेंनेही व्यक्त केला संताप...

"राज्यातील सरकार लुटेरे आणि डाकू आहेत. सत्तेची गर्मी आहे. कधी नव्हे असा पोलिसांवर दबाव आहे. मग तो आयपीएस अधिकारी असो को अन्य काही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबावतंत्र सूरू आहे. या घटनेचा निषेध करतो, सरकारने राजीनामा द्यावा," अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT