Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'आमच्याकडे या CM व्हा', नाना पटोलेंची अजित पवार आणि शिंदेंना खुली ऑफर

Nana Patole Offer To Shinde And Ajit Pawar: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना राजकीय होळीची खास ऑफर दिलीय. काय आहे ही ऑफर?

Bharat Jadhav

राज्यात जागोजागी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेत महायुती काँग्रेसला खिळ-खिळी बनवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पक्षांकडून मोठ्या प्रमणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला जात आहे. यामुळे महायुतीमधील सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपला चीतपट करण्यासाठी काँग्रेसने महायुती सरकारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गळ घालत मोठी ऑफर दिलीय. ही ऑफरही साधी नाहीये.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीय. साम वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना नाना पटोलेंनी ही राजकीय होळीची ऑफर दिलीय. नाना पटोले यांनी सत्ताधारी नेत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खास पद्धतीत होळीच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी काँग्रेसमध्ये या आणि सीएम व्हा! अशी ऑफर पटोलेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना दिलीय.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. त्यानंतर थेट मुख्यमंत्री व्हावं, अशी राजकीय होळीची ऑफर पटोलेंनी दिलीय. त्यामुळे जर दोन्ही नेत्यांनी ही ऑफर स्विकारली तर महायुती सरकार एकाच झटक्यात कोसळू शकतं. दरम्यान ही ऑफर देत असताना नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना डिवचलंय. महायुती सरकारमध्ये दोन्ही नेत्यांची अवस्था खराब झालीय.

भाजपचे मित्रपक्षांचे नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे खूप त्रासलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व कारभार हा मुख्यमंत्री कार्यालयातून चालवला जाणार असल्याचा संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. फडणवीस दोन्ही नेत्यांना संपवण्याचं काम करत आहे. त्यामुळे माझी दोन्ही नेत्यांना खुली ऑफर आहे. जर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर आम्ही दोघांना मुख्यमंत्री बनवू. दोन्ही नेत्यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवू, असं नाना पटोले म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. ते खोटं बोलतात असा आरोप नाना पटोलेंनी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस हे आमचे मित्र आहेत, ते सर्वांनाच माहिती आहे. त्यांना शुभेच्छा देतो, पण अलीकडच्या काळात फडणवीस खूप फेकत आहेत. खोट बोलतात पण मित्रांनी खोटं बोलू नये, असंही पटोले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Malavya Rajyog 2026: एका वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

MNS-Shivsena: ठाकरेंचे मुंबईत किती नगरसेवक?, शिवसेना-मनसेच्या विजयी शिलेदारांची यादी वाचा एका क्लिकवर

Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

SCROLL FOR NEXT