Political discussions intensify over the Leader of Opposition post in Maharashtra Vidhan Parishad. saam tv
महाराष्ट्र

Vidhan parishad Leader: राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडीचा लागणार निकाल?

Opposition Leader of Vidhan Parishad: राज्यसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणाची शक्यता आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे.

Bharat Jadhav

  • राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय अपेक्षित.

  • अंबादास दानवेंच्या जागा रिक्त झाल्यानंतर नवीन निवड आवश्यक.

  • काँग्रेसचे सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद खाली होणार आहे. या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसच्या सतेज पाटील यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते निवडीत भाजपने राजकीय खेळी खेळल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. मे महिन्यात ९ विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत. भाजपच्या ४, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची १ जागा रिक्त होणार आहे

विधान परिषदेसाठी २९ मतांचा कोटा असणार असून महायुतीच्या वाट्याला ८ जागा येणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे. विधान परिषदेत काँग्रेसकडे ६, शिवसेनेकडे ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडे ३ जागा आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते निवडीचा निकाल राज्यसभेच्या निवडणुकीनंतर लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अंबादास दानवे यांची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद खाली झाल्यानंतर त्या जागी काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्षांचा कालावधी झालाय. त्यानंतर दोन अधिवेशन पार पडली तरीही हे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत. महाविकास आघाडीतील कुठल्याच पक्षाकडे १० टक्के संख्याबळ नसल्याचा दावा करत हे पद रिक्त ठेवलंय. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सहा वर्षाची कारकीर्द पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ते निवृत्त झालेत.

विधान परिषदेत काँग्रेसचे ६, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला असे ठरले आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसच्या सतेज पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माज उतरलेला नाही; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

रुपाली चाकणकरांना अशोक खरात प्रकरण भोवलं; महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार

Saturday Horoscope : अचानक पैशांची भरभराट होणार; वृषभसह ५ राशींच्या लोकांना लागणार लॉटरी

अशोक खरातची दुसरी बाजू....; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

Air India: हवेतच ७ तास घिरट्या अन्..; दिल्लीहून व्हँकुव्हर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं काय झालं?

SCROLL FOR NEXT