ashok chavan Saam TV
महाराष्ट्र

Ashok Chavan News: 'स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न..' अशोक चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

Maharashtra Political News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा करत कॉंग्रेस सरकारवर गंभीर आरोप केले.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी

Maharashtra Political News:

राज्य सरकारच्या कंत्राटीभरतीच्या निर्णयावरुन राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. कंत्राटी भरतीविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करत विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा करत कॉंग्रेस सरकारवर गंभीर आरोप केले. फडणवीसांच्या या आरोपांना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

कंत्राट भरतीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. "कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रात पहिला निर्णय मार्च २००३ साली झाला होता. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. २०१० मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाच कंत्राट भरतीचा पहिल्यांदा निर्णय घेतला होता," असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या या आरोपांवर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

"उच्चश्रेणीतील पदे आम्ही कंत्राटी पद्धतीने भरली नाहीत. पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार अशी पदे भरण्यात आमच्या काळात कंत्राटी पद्धतीने भरली नाहीत.. आता स्वतःच अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे," असे अशोक चव्हाण म्हणाले.

"चतुर्थश्रेणीची पदे कंत्राटी पद्धतीने भरली तर काहीही हरकत नाही. आम्ही चुकीचा निर्णय घेतला नाही... असे स्पष्टीकरणही अशोक चव्हाण यांनी दिले. तसेच आघाडी सरकारच्या काळातल हे पाप असल्याचे फडवणीस म्हणतात. पाप, पुण्य आता राहीले कुठे?" असा चिमटही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काढला.

"त्यांना काय एक्सपोज करायच हा त्यांचा प्रश्न आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती ठीक नाही त्यावर सत्ताधार्यानी लक्ष द्यावे.." असे म्हणत अशोक चव्हाण यांनी फडणवीसांच्या आरोपांना चोख प्रत्यूत्तर दिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT