Chhagan Bhujbal Meet Amit Shah  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: छगन भुजबळ मालेगावात उलघडणार मनातील 'पत्ता'; अमित शहांशी करणार चर्चा

Chhagan Bhujbal Meet Amit Shah: मालेगावला सहकार परिषद होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही परिषद होणार असून या परिषदेला छगन भुजबळ सुद्धा हजर राहणार आहेत.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मालेगावमध्ये आपला पत्ता खोलण्याची शक्यता आहे. नाराज छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहेत. त्याचदम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा मालेगाव येथील सहकार परिषदेला जाणार आहेत. याच कार्यक्रमाला भुजबळ सुद्धा जाणार आहेत. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

मालेगावला उद्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सहकार परिषद होणार आहे. या परिषदेला छगन भुजबळदेखील उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहांशी चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. अनेकदा उघड नाराजी व्यक्त करूनही पक्षाकडून भुजबळांच्या नाराजीची दखल घेतली जात नसल्यानं भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ही नाईट क्रीम; स्किन होईल नॅचरल ग्लोईंग आणि स्मूद

Induction Vastu Tips: किचनमध्ये इंडक्शन कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार नियम जाणून घ्या

Maharashtra News Live Update: SIR संदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! २३ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून 'यलो अलर्ट

Mumbai Police: इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले

SCROLL FOR NEXT