Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? भुजबळांकडून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ येवल्याची आमदारकी सोडणार असल्याची चर्चा रंगलीय. आमदारकी सोडून भुजबळ कुठे जाणार ? त्यांच्याऐवजी येवल्याच्या रिंगणात कोण उतरणार यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Tanmay Tillu

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नव्हते.. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. दोन महिने उलटूनही भुजबळांकडून 'वेट अँड वॉच'चीच भूमिका घेतली जातेय. त्यातच आता प्रकृती अस्वास्थामुळे ते १८-१९ ला शिर्डीतील अधिवेशनालाही ते गैरहजर राहणार असल्याचं कळतंय.त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलायं.

पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले भुजबळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. याविषयीची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यामुळे व्यथित झालेल्या भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. फडणवीस यांनी त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतरही भुजबळ यांच्याशी पक्षातर्फे संपर्क साधण्यात आला नाही. एवढचं काय पंतप्रधान मोदींच्या आमदारभेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते. भुजबळ मुंबईत असूनही ते या कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्यानं भुजबळांबाबत चर्चा अधिक रंगू लागल्यात.

नाराज भुजबळ भाजपच्या वाटेवर?

छगन भुजबळ 2 महिन्यांनंतरही वेट अँड वॉचच्या भूमिकेत

भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत - सूत्र

भुजबळ राष्ट्रवादी सोडणार,भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?

येवल्यातून समीर भुजबळांना रिंगणात उतरवण्याची काका-पुतण्याची रणनिती

भुजबळांचं आतापर्यंतचे राजकारण पाहता ते फार काळ स्वस्थ राहतील किंवा 'साईड ट्रॅक'ला जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे राजकारणात मुरलेल्या आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले भुजबळ काय निर्णय घेतात हेच पाहायचं. मात्र भुजबळांमुळे कोणाचं बळ वाढणार आणि कोणाला फटका बसणार यावर राज्यातील ओबीसी राजकारण फिरणार एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT