BJP MLA Nitesh Rane  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मोठी बातमी! आमदार नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Case registered against BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलंय. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Rohini Gudaghe

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही नवी मुंबई

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उलवे येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. राणे यांनी उलवे येथे गणेश दर्शनादरम्यान आक्षेपर्ह वक्तव्य केलं होतं. दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आमदार नितेश राणे उलवे येथे गणेश दर्शनासाठी गेले होते. यावेळी भाषणादरम्यान राणे यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे एनआरआय पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य (Maharashtra Politics) केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार नितेश राणे यांना आक्षेपार्ह वक्तव्य चांगलंच भोवलंय.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

भाजप नेते नितीश राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण पुन्हा तापलंय. नितेश राणे यांनी प्रॉपर्टी डीलिंग आणि धर्माचा संबंध जोडून उलवे येथे जनतेला निवेदन केलं होतं. हिंदूंनी मालमत्तेचा व्यवहार त्यांच्याच धर्मातील लोकांशीच (Case registered against BJP MLA Nitesh Rane) करावा, असं राणे म्हणाले. राणे यांनी रिअल इस्टेट ब्रोकर्सना बिगर हिंदूंसोबत प्रॉपर्टीचे व्यवहार न करण्याचं आवाहन केलं होतं. एवढेच नाही, तर प्रॉपर्टी डील करण्यापूर्वी आधार कार्ड देखील तपासा असं नितेश राणे म्हणाले होते.

दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य

नितेश राणे यांच्या या विधानाला एआयएमआयएमने विरोध केला (objectionable statements) होता. राणे यांचं वक्तव्य देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचं एआयएमआयएमने म्हटलंय. राणे यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलीय.विशिष्ट धर्माचे पवित्र ग्रंथ हिंदूंच्या धर्मांतराचा संदेश देतात. या धर्माच्या कोणत्याही पंडिताने पुढे येऊन त्याचे खंडन करावे, असे आव्हान देखील राणे (Nitesh Rane) यांनी दिलं होतं. राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT