Nitesh Rane : आमदार नितेश राणे पुन्हा गोत्यात, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा; लवकरच अटक होणार?

MLA Nitesh Rane Latest News : अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
आमदार नितेश राणे पुन्हा गोत्यात, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा; लवकरच अटक होणार?
Nitesh RaneSaam TV
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर

भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण, अहमनगर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

आमदार नितेश राणे पुन्हा गोत्यात, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा; लवकरच अटक होणार?
Maharashtra Politics: महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? अजित पवार गट 60 तर शिंदे - भाजप किती जागांवर निवडणूक लढणार? वाचा...

मी हिंदूंचा गब्बर असून रस्त्याने चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. इतकंच नाही तर रामगिरी महाराज यांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू अशी धमकी देखील नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून दिली.

त्यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले. यावरुन विरोधी पक्षांनी देखील सत्ताऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. नितेश राणे सातत्याने समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अनेकांनी केली.

दरम्यान, अहमदनगर पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह मोर्चाचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

नितेश राणेंना अटक करा : वारिस पठाण

नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी आमदार राणे यांना अटक करावी, अशी मागणी एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये वारिस पठाण म्हणतात, " भाजप आमदार नितेश राणे उघडपणे धमकी देत ​​आहेत की ते मशिदीत घुसतील आणि मुस्लिमांना मारतील."

"आमदार राणे यांचे हे प्रक्षोभक भाषण असून ते समाजात द्वेष पसरवत आहेत. भाजप निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जातीय हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचे सीएमओ आणि डीजीपी यांनी या संपूर्ण भाषणाची दखल घ्यावी. याप्रकरणी तत्काळ एफआयआर नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात यावे", अशी मागणी वारिस पठाण यांनी केली.

आमदार नितेश राणे पुन्हा गोत्यात, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा; लवकरच अटक होणार?
Weather Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस, तब्बल 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; वाचा वेदर रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com