Maharashtra Politics Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रेकिंग! वसंत मोरे वंचितची साथ सोडून 'शिवबंधन' बांधणार, आज मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेणार; पाहा VIDEO

Maharashtra Politics Breaking News: लोकसभेआधी मनसेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेले वसंत तात्या मोरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. ४ जुलै २०२४

लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच लोकसभेआधी मनसेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेले वसंत तात्या मोरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या तोंडावर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. वंचितकडून ते निवडणूकही लढले होते.

आता विधानसभेआधी ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज वसंत मोरे हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. वसंत मोरे हे खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच ते ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

संजय राऊतांचे सूचक वक्तव्य..

दरम्यान, वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही महत्वाचे विधान केले आहे. लवकरच वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करतील असे सूचक विधान राऊतांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT