Sharad Pawar Vs Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांचा 'हुकमी एक्का' लवकरच घरवापसी करणार? अजितदादांचे टेन्शन वाढणार

Sharad Pawar And Ajit Pawar: मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Priya More

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मधुकर पिचड यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले होते. आता पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहेत. पण महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे चिन्ही तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत मधुकर पिचड आणि वैभव पिचड? -

जेष्ठ नेते मधुकरराव पिचड शरद पवारांचे जुने सहकारी आणि खंदे समर्थक आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोब ते मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. २०२४ पर्यंत ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार होते. २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांचा मुलगा वैभव पिचड आमदार झाले. २०१९ साली पिचड पिता - पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐनवेळी शरद पवारांनी किरण लहामटे यांना उमेदवारी दिली. २०१९ मध्ये वैभव पिचड यांचा पराभव झाला.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार किरण लहामटे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे महायुतीत मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांची राजकीय अडचण झाली. उमेदवारी करण्यासाठी पर्यायाची गरज आहे. अशातच मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पिचड पुन्हा शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण ही भेट पेसा कायद्यासंदर्भात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पिचड यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर अजित पवार गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT