Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News: हिंमत असेल तर शपथेवार सांगा; तुम्ही देवेंद्रजींचे... बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: अमित शहांनी दिलेला शब्द न पाळल्यानेच भाजप कार्यकर्त्यावर सतरंजी उचलण्याची वेळ आल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Gangappa Pujari

सुरज मासूरकर, प्रतिनिधी...

Maharashtra Politics News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल पोहोरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर आज त्यांनी अमरावतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी पोहरादेवीची शपथ घेवून काय सांगतो.. २०१९ मध्ये अमित शहांनी दिलेला शब्द न पाळल्यानेच भाजप कार्यकर्त्यावर सतरंजी उचलण्याची वेळ आल्याची खोचक टीका त्यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे..

यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) बोलताना परत एकदा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिल्याचं सांगितले. तसेच आजच्या सभेतही त्यांनी आई- वडिलांची शपथ घेण्याचा पुनरुच्चार केला. त्यांच्या याच टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. (Maharashtra Politics)

चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्वीट...

उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा. पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर . 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे फोन का घेतले नाहीत; हे सांगाच.. " असे थेट आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी "घ्या, जगदंबेची शपथ घेवून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत " आहात, तर तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते? आता सांगाच, असे म्हणत घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता.." असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT