Ashok Chavan Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: तिकीटासाठी अशोक चव्हाणांनी ५०-५० लाख घेतले, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

BJP Leader Ashok Chavan: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेडमध्ये राजकारण तापले आहे. तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या नेत्याने अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केला. तिकीटासाठी अशोक चव्हाणांनी ५०-५० लाख घेतले असल्याचा आरोप करण्यात आला.

Priya More

Summary -

  • नांदेड महापालिका निवडणुकीत राजकारण तापले

  • अशोक चव्हाण यांच्यावर तिकीटासाठी ५० लाख घेतल्याचा आरोप

  • माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा खळबळजनक दावा

  • भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली

संजय सूर्यवंशी, नांदेड

'तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी ५०- ५० लाख रुपये घेतल. त्यांनी कार्यकर्त्यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप माजी नगरसेवकाने केले आहे. माजी नगरसेवकाच्या या आरोपामुळे नांदेडमधील राजकारण तापले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. मात्र माजी नगरसेवकाचे आरोप अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले. 'कोणालाच पैसे मागितले नाही. अशोक चव्हाण यांची कारकीर्द ५० वर्षांची आहे.', असे त्यांनी सांगितले.

नांदेड महापालिका निवडणुकीत तिकीट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उमेदवारांकडून ५०-५० लाख रुपये घेतल्याचा आरोप माजी नगरसेवकाने केला. भानुसिंह रावत हे १९८० पासून चव्हाण कुटुंबीयांशी एकनिष्ठ होते. अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर भानुसिंह रावत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक १६ मधून त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. उमेदवारी देण्याचा अशोक चव्हाण यांनी शब्दही दिला होता. मात्र त्यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही.

शब्द देऊन सुद्धा अशोक चव्हाण यांनी उमेदवारी दिली नाही. त्यांनी दुसऱ्या उमेदवाराकडून ५०-५० लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप भानुसिं हरावत यांनी केला. भाजपने दिलेल्या एकूण ६६ उमेदवारांपैकी केवळ १८ भाजपच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्याचे रावत म्हणाले. कार्यकर्त्यांचा अशोक चव्हाण यांनी बळी घेतल्याचा आरोपही रावत यांनी केला आहे.

हिरवा भाजप कोण करते आहे हे जनतेला माहित झाले आहे. देव त्यांना बघून घेईल असे भानुसिंह रावत यांनी सांगितले. दरम्यान, 'उमेदवारी देण्यासाठी कोणालाही पैसे मागितले नाही. अशोक चव्हाण यांची कारकीर्द पन्नास वर्षांची आहे.' अशी प्रतिक्रया देत अशोक चव्हाण यांनी भानुसिंह रावत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र! शिवसेनेकडून खासदार होणार्‍या ज्योती वाघमारे कोण आहेत?

Pune Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरने ३ ते ४ वाहनांना उडवलं

Nashik : व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही, कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा

Viral Video : बैलासोबत व्हिडिओ बनवणं पडलं महागात; विदेशी महिलेसोबत भयकंर घडलं, घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल, VIDEO

Men's Skin Care : पुरुषांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT