भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत आरपारची भाषा करणाऱ्या ठाकरे गटाला आता संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिल्याचं समोर आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात जाऊन चंद्रकांत पाटलांनी दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट दिलं.
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं दिसत आहे. तर ठाकरेही महाविकास आघाडीत नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान ठाकरे आणि भाजपमध्ये पुन्हा जवळीक वाढल्याचं चित्र आहे. ते नेमकं कसं ? पाहूयात.
जुने मित्र पुन्हा एकत्र येणार?
- 27 जून 2024
चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंना चॉकलेट भेट
- 17 डिसेंबर 2024
मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांची भेट घेत ठाकरेंकडून अभिनंदन
- 20 डिसेंबर 2024
हिवाळी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची भेट
- 3 जानेवारी 2025
गडचिरोलीतील विकासकामांवरुन ठाकरेंच्या मुखपत्रातून फडणवीसांचं कौतूक
- 9 जानेवारी 2025
आदित्य ठाकरेंकडून पुन्हा फडणवीसांची भेट
- 29 जानेवारी 2025
पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात ठाकरे-पाटील भेट
या चॉकलेट भेटीवरून चर्चा रंगत असतानाच ही भेट संसदीय परंपरेनुसार असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलंय..विशेष म्हणजे दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट देत असताना दानवेंच्या दालनात उपस्थित असलेल्या काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते सतेज पाटलांना मात्र पाटील यांनी चॉकलेट दिलं नाही. त्यामुळे ठाकरेंना दिलेलं चॉकलेट हे पुन्हा कुछ मीठा हो जाये या भूमिकेतून देण्यात आलंय की शिंदेंवर दबाव वाढवून चेकमेट करण्यासाठी? याचीच राज्यभर चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.