Bjp Vs Shinde Sena In Akola: Four Councillors Face Disqualification saam tv
महाराष्ट्र

भाजप-शिवसेना आमनेसामने; शिंदेसेनेच्या 4 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, राजकीय वर्तुळात खळबळ

Disqualification Against Four Shiv Sena Corporators: अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या चार नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा ठराव मंजूर झालाय. भाजपच्या १२ नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या चार नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला होता.

Bharat Jadhav

  • हिवरखेड नगरपरिषदेत शिंदेसेनेच्या चार नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा ठराव

  • भाजप आणि शिंदेसेनेत अकोल्यात राजकीय संघर्ष

  • १५ विरुद्ध ५ मतांनी नगरसेवकांच्या अपात्रतेचा ठराव मंजूर

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

महायुतीमध्ये आधीच विधानपरिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून तणावाचे वातावरण असताना अकोल्यात शिवसेना-भाजप आमनेसामने आलेत.अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत मोठी राजकीय घडामोड घडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या ४ नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आलाय.

१५ विरुद्ध ५ अशा मतांनी हा ठराव पारित झाल्याने शिंदेसेनेच्या नगरसेवकांवर आता अपात्रतेची टांगती तलवार लटकलीय. महायुतीत वाद सुरू असतानाच भाजपकडून शिवसेनेला हा आणखी एक राजकीय धक्का मानला जातोय.

हिवरखेड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे एकूण पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी रवी घुंगड, ऋषिकेश पंचबुद्धे, रामेश्वर हागे आणि श्यामशील भोपळे या चार नगरसेवकांविरोधात भाजपच्या १२ नगरसेवकांनी अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आज विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.

या विशेष सभेत हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी ठरावाच्या बाजूने १५ मते पडली, तर विरोधात ५ मते मिळाली. त्यामुळे १५ विरुद्ध ५ अशा बहुमताने चार नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला.

महायुतीत पुन्हा संघर्षाची ठिणगी?

एकीकडे राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून सत्तेत एकत्र आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांवरून महायुतीतील मतभेद वारंवार समोर येत आहेत. विधानपरिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून आधीच तणाव निर्माण झालेला असताना हिवरखेडमधील या घडामोडीमुळे भाजप आणि शिंदेसेनेतील स्थानिक राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

नगपालिकेच्या विशेष सभेत ठराव मंजूर झाला असला तरी संबंधित चार नगरसेवक प्रत्यक्षात अपात्र ठरले आहेत का, याबाबतचा अंतिम निर्णय आणि पुढील अधिकृत प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; ठाकरे गटाच्या शाखेला शिवसैनिकांनी ठोकले टाळे?

दिवाळीत 10, 20, 50च्या नोटांचा तुटवडा? RBIने लहान नोटांची छपाई कमी केली?

Jaggery Vs Sugaar For Ladoo: लाडू बनवताना गूळ की साखर काय वापरावे? आरोग्यासाठी काय बेस्ट?

'गोकुळ'मध्ये महायुतीचं सरकारी बहुमत; शासनाचे 4 सदस्य नेमण्यास मंजुरी

Palm Itching Meaning For Men And Women: स्त्रियांच्या तळहाताला खाज सुटली की पैसा मिळतो तर, पुरूषांबाबत शुभ की अशुभ?

SCROLL FOR NEXT