Uddhav Thackeray arrives at Silver Oak to meet Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; काय आहे कारण?

Uddhav Thackeray meet Sharad Pawar : सिल्व्हर ओक या निवासस्थानी होत असललेल्या या भेटीत नेमकी काय खलबंत होतात हे पाहावं लागले.

Chandrakant Jagtap

Uddhav Thackeray arrives at Silver Oak to meet Sharad Pawar : राज्याच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येत येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पंरुतु या भेटत आघाडीतील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचं कळतंय.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. शिवाय सावरकर मुद्द्यावरून देखील ठाकरे गट आक्रमक झाल्यानतंर काँग्रेसची अडचण झाली आहे. या सगळ्यात पवारांनी मध्यस्थी करून विषय मिटवला असला तरी आता मतभेत दूर झालेत का हा प्रश्नच आहे.

शिवाय गेल्या काही दिवसांपासून मविआमध्ये सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे या सिल्व्हर ओक या निवासस्थानी होत असललेल्या या भेटीत नेमकी काय खलबंत होतात हे पाहावं लागले.

ठाकरे-पवार भेटीवर विनायक राऊत काय म्हणाले?

"महाविकास आघाडीचे नेते आहे. विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी ही भेट होत आहे. ज्या पद्धतीने भाजपचे नेते चंद्रकांत पाटील असो की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असो बकवासगिरी करत आहे. तसं महाविकास आघाडीत काहीच नाही. महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी नाही. चर्चा करणारे हे मिंधे गट आणि भाजप आहेत. आज आम्ही एकोप्याने महाराष्ट्रात आहोत", अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगानं काल राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे, त्यामुळं महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीसह ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ या अन्य दोन पक्षांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. (Maharashtra Politics)

दुसरीकडे शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडण्याची शक्यता आहे असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी खुशखबर! १० तोळा सोन्याचे दर २८०० रुपयांनी घसरले; वाचा सविस्तर

Aamir Khan GF Gauri : "कहा से आते हो आप लोग..."; पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर आमिर खानची गर्लफ्रेंड भडकली, पाहा VIDEO

Plum Cake Recipe : महागडा 'प्लम केक' घरीच सिंपल पद्धतीने बनवा, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Lava Bold N1 5G: कमी पैशात हाय-टेक फोन! 5000mAh बॅटरी, मोठी स्क्रीन आणि जबरदस्त फीचर्स, किंमत किती?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे दादर स्थानकावर दाखल; लोकलने चर्चगेटला जाणार | VIDEO

SCROLL FOR NEXT