Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Chandrapur Political News: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अनेक बड्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपची साथ सोडली. या सर्वांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढली.

Priya More

Summary -

  • विदर्भातील चिमूरमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  • जुनेद खान, संतोष गोहणे, सतीश वनकर यांनी भाजपची साथ सोडली

  • नांदेडच्या हिमायतनगरमध्ये मोहम्मद जाविद यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणात मोठा बदल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला. या नेत्याने पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे चंद्रपूरचे भाजप आमदार बंटी बागडिया यांना धक्का बसला.

चिमूर मतदारसंघातील भाजप नेत्यांनी पक्षाची साथ सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्री जुनेद खान, माजी नगराध्यक्ष संतोष गोहणे, भाजप नेते चिमूर सतीश वनकर या सर्व भाजपच्या बड्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यांच्या पक्ष प्रवेशामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे.

दरम्यान, हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जाविद यांच्यासह शेकडो जणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित मोहम्मद जाविद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगरमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर मोहम्मद जाविद यांची नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाची साथ सोडली.

नांदेडच्या हिमायतनगर नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यातच हिमायतनगर नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित आज नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोहम्मद जाविद यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिल्याने हिमायतनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नांदेडमध्ये राष्ट्रवादीच ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार; भाजप सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: मराठा अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळमध्ये चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT