Major reshuffle in Sharad Pawar’s NCP Maharashtra Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल,10 नेत्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आलाय. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी १० प्रवक्त्यांची निवड करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल

  • कोअर कमिटीच्या बैठकीत १० प्रवक्त्यांची निवड करण्यात आली आहे.

  • या प्रवक्त्यांवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी

राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी हाती आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार अशी चर्चा असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा फेरबदल करण्यात आलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या कोअर कमिटीच्या बैठकीत शरद पवार गटानं १० नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. या नेत्यांवर १० प्रवक्त्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. या प्रवक्त्यांवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठकीत निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे महत्त्वाचे नेते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्रजी शिंगणे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार आले होते.

या बैठकीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी 10 प्रवक्त्यांची नावं ठरवण्यात आली होती. अनुभवी जितेंद्र आव्हाड यांच्यासह तरुण कार्यकर्ते अनिश गवांदे, महेबूब शेख, हेमाताई पिंपळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलीय.

प्रवक्त्यांची नावे काय?

जितेंद्र आव्हाड

क्लाईड क्रास्टो

भीमराव हत्तीअंबीरे

अनिश गवांदे

अॅड. फैजल मिर्झा

महेबूब इब्राहीम शेख

प्रवीण कुंटे पाटील

प्रशांत सोनबा वीरकर

अॅड. हेमाताई पिंपळे

डॉ. चंद्रकांत बारेला

राष्ट्रवादीचं आता विलीनीकरण होऊ नये हेच माझं मत: सुप्रिया सुळे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी एक मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीचं आता विलीनीकरण होऊ नये हेच माझं मत असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलीय. "अजितदादा आता हयात नाहीत, आता काय चर्चा करणार?" असा प्रश्न विचारत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. पक्षाने विचारल्यास राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं नाही हीच माझी भूमिका असेल. अजित पवार असताना केवळ चौघांमध्येच याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा काय चर्चा झाली हे अजित पवार, मी, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनाच माहिती आहे, असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळी परिस्थिती, बळीराजानं फोडला टाहो; हेक्टरी 50 हजार मदतीची पवारांची मागणी

Maharashtra News Live Update: मालवणमध्ये नदीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

जरांगेंना डिफेंडर, 2 लाखांचा फोन देणारे कोण? 'माझ्याकडे 1400 कोटींच्या कंत्राटाचे पुरावे'

पक्षफोडीसाठी भाजप-आयोगाची युती, बड्या नेत्याचा आरोप, तृणमूलचं चिन्ह गोठवलं, शिवसेनेचं काय होणार?

मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत भाजपनं साधला डाव; विरोधकांना चीतपट देण्यासाठी चव्हाण मैदानात

SCROLL FOR NEXT