BJP leaders during a party meeting where the new municipal election ticket policy was discussed.discussed. Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांचं निलंबन; अमरावतीमधील राजकारणात मोठी खळबळ

BJP Suspends 15 Party Worker: निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या १५ पदाधिकाऱ्यांना भाजपनं पक्षातून निलंबित केले आहे. यामुळे अमरावतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

Bharat Jadhav

  • अमरावतीत भाजपनं १५ पदाधिकाऱ्यांचं निलंबन

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय खळबळ

  • पक्षविरोधी कारवायांचा गंभीर आरोप

अमर घटारे, साम प्रतिनिधी

भाजपमध्ये गटबाजी करणारे आणि पक्ष निर्णयांना विरोध करणाऱ्या पक्षातील 15 पदाधिकारी व सदस्यांवर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधातच या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली होती. निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निर्णयांना आवाहन दिले तसेच पक्षाच्या हिताच्या विरुद्ध कारवाया केल्याचे गंभीर प्रकार निदर्शनास आले.

ही कृत्य भारतीय जनता पार्टीच्या संविधानातील पक्षशिस्त निष्ठा आणि संघटनात्मक मूल्यांचा अपमान करणारी असल्यामुळे पदाधिकाऱ्यांवर करावाई करण्यात आलीय. पक्षाविरोधी वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानं संघटनात्मक शिस्त धोक्यात आली. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी निलंबनाची कारवाई केली.

विवेक चुटके, ज्योती वैद्य, गौरी मेघवानी,किशोर जाधव,अनिषा मनीष चौबे, सचिन पाटील, संजय वानरे, सतीश करेसिया, शिल्पा पाचघरे, दीपक गिरोळकर, योगेश वानखडे, मेघा हिंगासपुरे, संजय कटारिया, रश्मी नावंदर, धनराज चक्रे यांना पक्षाच्या अधिकृत अधिकारांतर्गत व वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वसह सर्व पदांवरून तात्काळ शहर डॉ. अध्यक्ष नितीन धांडे यांच्या आदेशाने निलंबित करण्यात येत आहे.

BJPची गटबाजीवर करडी नजर

भाजप अंतर्गत जिथे मोठ्या प्रमणात गटबाजी आहे तिथे नजर ठेवण्यासाठी प्रदेश भाजपने समांतर यंत्रणा राबविलीय. सोलापूर, अमरावती, चंद्रपूर आदी शहरांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. जळगावमध्ये तर भाजपमधील २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलीय. चंद्रपूर येथील भाजपच्या बंडखोर कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पक्षाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात रोड शोमध्ये एका बाजूला आमदार सुधीर मुनगंटीवार, तर दुसऱ्या बाजूला आ. किशोर जोरगेवार दिसले. मात्र संपूर्ण प्रवासात या दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले. त्यामुळे सूर बिघडल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरूय.

नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपात मोठी बंडखोरी

नागपूरमधील भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यासह ३२ जणांचं निलंबन करण्यात आलंय. पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यामुळे आणि पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय. यात भाजपचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांचाही समावेश आहे. नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या नेत्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT