Three major leaders from the Sharad Pawar camp join BJP in Dondaicha, boosting party strength ahead of local elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दोंडाईचामध्ये डाव साधला; शरद पवार गटात खिंडार, तीन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Political Earthquake in Dondaicha: दोंडाईचामध्ये मोठी राजकीय घडामोड झालीय. शरद पवार गटातील तीन प्रमुख नेते भाजपमध्ये सामील झालेत. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपने महाराष्ट्रभर 'ऑपरेशन लोटस' मोहीम राबवत आहे.

Bharat Jadhav

  • दोंडाईचामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का

  • तीन मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

  • महाविकास आघाडीला भाजपचा दे धक्का

भूषण अहिरे, साम प्रतिनिधी

आहिल्यानगरनंतर आता दोंडाईचामध्ये भाजपनं डाव साधत शरद पवार गटाला जबर धक्का दिलाय. राज्यातील अनेक स्वराज्य संस्थांवर कमळ फुलवण्यासाठी भाजप नेते कामाला लागलेत. नगरपरिषद निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. सर्वत्र पक्षप्रवेशांचा सोहळे होत आहेत.

दोंडाईचामध्ये भाजपने शरद पवार गटाला धक्का देत आपली ताकत वाढवलीय. महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये जात आहेत. स्थानिक राजकारणात पक्ष मजबूत होण्यासाठी भाजप जागोजागी ऑपरेशन लोट्स राबवत आहे. दोंडाईचामध्ये भाजपनं शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय.

जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. हा शरद पवार यांना शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. आदिवासी समाजाचे नेते व माजी नगरसेवक रवी जाधव यांच्यासह माजी तीन नगरसेवक व शेकडो समर्थकांनी कमळ हाती घेतलंय.

या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद आणखीनच वाढली आहे. माजी नगरसेवकांच्या या पक्ष प्रवेशामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मोठे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल असे चित्र बघावयास मिळत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप

भाजपने रोहित पवार यांना मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. अहिल्यानगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्यासोबत माजी नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

आगामी नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं हा रोहित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Tejaswini Lonari : "हलद लाविते गं..."; सरवणकरांची होणारी सून हळदीत रंगली, पाहा खास PHOTOS

Putin India Visit: ४ वर्षांनंतर व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर, ३० तासांचा मेगाप्लान; १० लाख नोकऱ्या आणि अणुकराराची शक्यता

Suraj Chavan Wife Photos: हिरवी साडी अन् हिरवी चोळी, सूरज चव्हाणच्या बायकोचे सुंदर फोटो

SCROLL FOR NEXT