Congress Setback In Amravati Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

Congress Setback In Amravati Politics: अमरावतीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेसेनेला मोठा धक्का बसला. ठाकरेसेना आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला.

Priya More
  • अमरावतीमध्ये ठाकरेसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का

  • प्रकाश साबळे यांनी काँग्रेसची साथ सोडली

  • रवी राणा यांच्या पक्षात केला प्रवेश

  • त्यांच्यासोबत १५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश साबळे यांनी पक्षाची साथ सोडली आणि त्यांनी रवी राणा यांच्या स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. प्रकाश साबळे यांच्यासोबत काँग्रेस आणि ठाकरेसेनेच्या १५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यामुळे अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या पक्षाची ताकद चांगलीच वाढली आहे. स्वाभिमान पक्षाची ताकद वाढवण्यासाठी रवी राणा यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीत विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आज युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार भैय्यासाहेब साबळे यांचे चिरंजीव काँग्रेसमधील मोठं नेतृत्व समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. रवी राणा यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वाभिमान पक्षाचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाश साबळे यांनी जिल्ह्यात युवक काँग्रेसमध्ये मोठं काम करत थेट राहुल गांधी यांच्यापर्यंत जाऊन पक्षाचे काम केलं. यासोबतच त्यांनी अमरावती जिल्ह्यात युवक काँग्रेसची चांगली मोटबांधली होती. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना यश मिळालं आणि ते निवडून आले होते. जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले होते. मात्र काँग्रेसमध्ये योग्य न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी गेल्या ५ वर्षांपासून स्वतंत्र समाजकार्य केलं.

प्रकाश साबळे यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठी राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार संपूर्ण राज्यभर वितरित करत शेतकऱ्यांना एक प्रकारचा सन्मान दिला होता. मात्र काँग्रेसमध्ये त्यांना योग्य न्याय न मिळाल्याने प्रकाश साबळे यांनी आज रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. प्रकाश साबळे यांच्यासोबत काँग्रेसचे १०० आणि ठाकरे गटाच्या ४० कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. यावेळी युवा स्वाभिमान पक्षात प्रकाश साबळे यांना मोठी जबाबदारी देखील देण्यात आली. युवा स्वाभिमान पक्षाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रकाश साबळे यांच्याकडे सोपवण्यात आली. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे अमरावती जिल्ह्यात रवी राणांची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात पक्षप्रवेश

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकट! 'या' भागांत पाणी पुरवठा राहणार बंद ; वाचा A to Z माहिती

Samantha Ruth Prabhu: ३९ व्या वर्षी अभिनेत्री होणार आई, समंथाने चाहत्यांसोबत शेअर केली प्रेग्नन्सीची गोड बातमी

SCROLL FOR NEXT