रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सुनेत्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि भाजपला मोठा धक्का दिला. नुकताच खोपोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या १०० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राजकीय शक्तिप्रदर्शन केले. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेसह विविध पक्षांना जोरदार झटका दिला. शिंदेसेनेसह अन्य पक्षातील १०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली. गेल्या काही दिवसांपासून खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे.
खोपोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सध्या जोरदार चढाओढ सुरू आहे. या पक्ष प्रवेशानंतर कर्जत खालापूर मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.