राज्याच्या पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सुत्रांनी ही माहिती दिली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे या खासदारांचे तळ्यात मळ्यात सुरू होतं. या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार फुटणं आवश्यक होतं. त्यामुळे खासदाराचे मन वळवण्यासाठी वेळ घेण्यात आले.
ऑपरेश टायगर सक्सेसफुल झाले आहे. आता ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
- महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना भविष्याची चिंता आहे.
- खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळवण्यातही अडचणी येत आहेत.
- केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचं सरकार असल्यानं त्याचा फायदा खासदारांना होईल.
- एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेनं स्वीकारलं आहे.
- केंद्रात भाजपची साथ, मतंदारसंघात विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.