Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Dr. Shrikant Shinde : अंबरनाथमध्ये महायुतीत बिनसलं? श्रीकांत शिंदेंचं भाजपाला रोखठोक आवाहन

Maharashtra Political News : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये चुरस वाढली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला रोखठोक आव्हान दिलं आहे.

Alisha Khedekar

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद

श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला दिलं आव्हान

भाजपकडून तेजश्री करंजुले यांचं नाव चर्चेत

महायुतीत तणाव वाढला असून निवडणूकपूर्व वातावरण तापलं

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली असून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. अशातच अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांचे नाव पुढे आलं आहे. भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात नंदू परब यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहे, अशा शब्दात भाजपाला आव्हान दिलं आहे.

अंबरनाथच्या शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शहरातील विविध प्रभागातील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले डॉ. श्रीकांत शिंदे?

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले," मी महायुतीचा कार्यकर्ता असून आगामी निवडणुका महायुतीतच व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. परंतु कुणाला जर वेगळं लढायचं असेल, तर आमचीही तयारी असून ताकद आजमावायची असेल, तर आमच्याकडेही पैलवान तयार आहे." असं आव्हान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.

काय म्हणाले भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब ?

अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांचे नाव पुढे आलं असून नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अंबरनाथ पालिकेत एक लाख टक्के भाजपाचाच नगराध्यक्ष बसेल, असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

SCROLL FOR NEXT