Ambadas Danve-Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Ambadas Danve News: आमदार गणपत गायकवाड यांच्या रूपाने रामराज्य आलं; अंबादास दानवेंचा खोचक टोला

Ambadas Danve On BJP MLA Firing: हे रामराज्य गणपत गायकवाड यांच्या रूपाने जो गोळीबार केला त्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे, असा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, प्रतिनिधी|ता. ४ फेब्रुवारी २०२४

Ambadas Danve News:

चार दिवसांपूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने या राज्यात, देशात रामराज्य आल्याच्या वल्गणा केल्या होत्या आणि केल्या आहेत. मला वाटतं की हे रामराज्य गणपत गायकवाड यांच्या रूपाने जो गोळीबार केला त्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे, असा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

"भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या गोळीबार प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे रामराज्य भारतीय जनता पार्टीचे साधन सूचित रामराज्य स्वतःला म्हणवून घेते. हे रामराज्य गणपत गायकवाड यांच्या रूपाने जो गोळीबार केला त्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे, "अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली.

तसेच "या भारतीय जनता पार्टीचे आमदार दिवसाढवळ्या गोळीबार करतात आणि त्याच भारतीय जनता पार्टीचे सरकार जे आहे ते शिंदे साहेबांच ओळखलं जातं. त्यांच्या पक्षाचा माणूस जागेच्या वादातून एका आमदाराशी भांडण करतो त्यालाही गोळ्या लागतात त्यामुळे खऱ्या अर्थाने रामराज्य या गोळीबाराच्या रूपाने निर्माण करू पाहत आहेत का? असे म्हणत हे राम राज्य आहे की रावण राज्य आहे असा प्रश्न आम्हाला पडला," असा टोलाही दानवेंनी लगावला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाविकास आघाडी अभेद्य...

"इंडिया आघाडीही (India Aaghadi) देश पातळीवरील आहे आणि महाविकास आघाडी ही राज्य पातळीवरील आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने सगळ्या पक्षांना घेऊन येणाऱ्या निवडणूका लढवण्याचा निर्धार केला असल्याचं दानवे यांनी म्हटलं. आणि तशा पद्धतीने हा निर्धार निश्चितच सगळे पक्ष पुढे घेऊन जातील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT