Maharashtra Politics beed another nephew will join ajit pawar group ssd92 SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar News: राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर! जंगी स्वागताची तयारी; नागरी सत्कार होणार

Maharashtra NCP Crisis: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर अजित पवार प्रथमच बारामती दौऱ्यावर आहेत

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Ajit Pawar Visit Baramati: शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही बारामती दौऱ्यावर येणार आहेत. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर तब्बल ६५ दिवसांनी अजित पवार प्रथमच बारामती दौऱ्यावर आहेत. येत्या शनिवारी हा दौरा होण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीमधील (NCP) फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. राष्ट्रवादी पक्षात बंड करुन अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून सहभागी झाले. या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार हे प्रथमच बारामती येत आहेत.

या दौऱ्यामध्ये बारामतीकरांकडून (Baramati) नागरी सत्कार होत असल्यामुळे या नागरी सत्काराला उत्तर देताना अजित पवार आपल्या मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात.. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे व माळेगाव येथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.

दरम्यान, एरवी दर शनिवारी बारामतीत येणारे अजित पवार गेल्या दीड महिन्यांपासून बारामतीला आले नव्हते. त्यामुळे आता प्रदीर्घ कालावधीनंतर अजित पवार बारामतीत असल्यामुळे त्यांच्य सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी केली आहे.

बारामतीमधील कर्सब्यातील कारभारी सर्कल पासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून नंतर शारदा प्रांगणात संध्याकाळी त्यांचा नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT