Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आत्ताची सर्वात मोठी बातमी! अर्थ खातं मिळाल्यानंतर अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल

Ajit Pawar Latest News :अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Chandrakant Jagtap

Ajit Pawar on Silver Oak To Meet Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. अर्थ खातं मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला आणि युती सरकारला पाठिंबा देत 9 मंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टोकाची टीका देखील केली होती.

शरद पवारांनीही अजित पवारांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान आज अचानक अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर होत असलेल्या वार पलटवारादरम्यान अजित पवार शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. अजित पवारांसोबत कोण आहे आणि शरद पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे उपस्थित आहेत का? यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Tajya Marathi Batmya)

राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्वाची अशी ही बातमी आहे. त्यामुळे अजित पवार या ठिकाणी कोणाला भेटणार आणि काय चर्चा करणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. (Latest Political News)

दरम्यान शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पाटील यांच्यावर आज ब्रिज कँडी रुग्णालायत शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी शरद पवार दुपारी ब्रिज कँडीमध्ये गेले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी देखील सिल्व्हर ओकवर आले असावेत असा देखील एक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT