Maharashtra Politics Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू शिलेदार शरद पवार गटात प्रवेश करणार

Sharad Pawar vs Ajit Pawar Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुरानी हे लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

Satish Daud

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही संभाजीनगर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुरानी हे लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. तसे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. बाबाजी दुरानी यांनी काल परभणीत शरद पवार यांची भेट घेतली होती. आज त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जयंत पाटील यांची देखील भेट घेतली आहे. मी मनाने शरद पवार साहेबांसोबतच असल्याचं बाबाजानी दुरानी यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

माध्यमांसोबत बोलताना बाबाजानी दुरानी म्हणाले, "शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्याचं मुख्य कारण म्हणजे भविष्यात मला पवार साहेबांसोबत काम करण्याची इच्छा आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणे याचा अर्थ प्रवेश झाल्यासारखाच आहे. मी १९८५ पासून शरद पवार साहेबांसोबत आहे. यापूर्वी सुद्धा मी एका विचाराने काम केलेलं आहे".

"समविचारी पक्षासोबत काम करायला सोपं जातं. भिन्न भिन्न विचाराचे पक्ष असले तर त्या ठिकाणी थोडं काम करायला अवघड जातं. कार्यकर्त्यालाही अवघड जातं आणि मतदारालाही अवघड जातं. अजित पवार (Ajit Pawar) सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानेच काम करतात. पण त्या ठिकाणी दोन्ही बाजूने जे पक्ष आहेत. त्याच्यामुळे सगळेच आमच्यासारखे अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याच विटंबना होत असल्यासही दुर्राणी म्हणाले".

पुढे बोलताना दुरानी म्हणाले, "एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला शिंदे यांची शिवसेना. त्यांच्यात काम करणं म्हणजे अवघड आहे. मी मनाने शरद पवार यांच्या सोबतच आहे मात्र फक्त प्रवेशाची अधिकृत घोषणा बाकी आहे. पवार साहेब आणि आम्ही भविष्यात एका विचाराने काम करू. त्यामुळे लवकरच मोठी बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल".

"आज पुन्हा एकदा मी शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे. प्रवेश होणं म्हणजे काही नवीन नाही. पवार साहेबांबरोबर काम करणं म्हणजे प्रवेश केल्यासारखंच आहे", असंही दुरानी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत आले होते. त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपली आहे. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं. पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळेच ते नाराज असल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT