Deputy Chief Minister Ajit Pawar amid speculation of a cabinet reshuffle in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा उलटफेर; अजित पवार 'ते' मंत्रिपद सोडणार? काय आहे कारण?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता हे खातं मराठवाड्यातील आमदाराकडे सोपवण्यात येणार आहे. म्हणजेच काय मराठावाड्याच्या वाट्याला अजून एक मंत्रीपद मिळणार आहे.

Bharat Jadhav

  • माणिकराव कोकाटे दोषी ठरल्यानंतर त्यांचं क्रीडा मंत्रीपद काढून घेण्यात आलं.

  • क्रीडा खात्याचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला.

  • आता अजित पवार हे खातं सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

सदनिका लाटल्याप्रकरणात दोषी आढळल्यानंतर माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आपलं मंत्रिपद सोडावे लागले. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडील क्रीडा मंत्रीपद काढून घेण्यात आले.

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे अतिक्त खातं देण्यात आलं. आता याप्रकरणी नवी अपडेट हाती आलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याकडील क्रीडा खातं सोडणार आहेत. हे खातं आता दुसऱ्या एका आमदाराला दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

माजी माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद आता मराठवाड्यातील ला मिळणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे यांना मिळण्याची शक्यता आहे. नवघरे यांना मंत्री केल्यास मागील दोन दशकांपासून जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार सभेत अजित पवारांनी 'तुम्ही आमदार चंद्रकांत नवघरे यांना आमदार करा मी मंत्री करतो, असे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याने नवघरेंचे मंत्रिपद हुकले होते. आता मात्र चंद्रकांत नवघरेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

कोकाटे दोषी ठरल्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागी करू लागले. राजकीय दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत अजित पवार देखील होते. त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडील खाते कोणाकडे द्यायचे याची चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांनी क्रीडामंत्री पदाबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला. काही वेळ विचार केल्यानंतर अजित पवार यांनी क्रीडा मंत्रीपद आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुद्ध अटळ! छोटीशी ठिणगी उडवेल युद्धाचा भडका, भारतालाही बसणार फटका

Korean Face Mask: घरच्या घरी बनवा कोरियन फेस मास्क; २ वापरात मिळेल ग्लोईंग सॉफ्ट चेहरा

Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या

Foods to avoid with jaggery: कोणत्या भाज्यांमध्ये गूळ वापरू नये?

Tilgul Ladoo: मकर संक्रातीला बनवा मऊसूत गूळ-शेंगदाण्याचे लाडू, नोट करा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT