NCP leader Manikrao Kokate amid legal trouble after Nashik court upholds two-year conviction. saam tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Manikrao Kokate MLA Disqualification : महायुती सरकारमधील दुसरी विकेट जाण्याची शक्यता आहे. कारण कोकाटेंना अटक कऱण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.मात्र हे प्रकरण काय आहे. कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद जाणार का? आणि कोकाटेंना अटक होणार का? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली.

  • न्यायालयाकडून कोकाटेंना अटक करण्याचे आदेश.

  • आमदारकी रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली.

सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे कृषिमंत्रीपदावरुन डिमोशन झालेल्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा पाय आणखी खोलात गेलाय. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटेंना ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवत अटकेचे आदेश दिलेत. त्यामुळे कोकाटेंना अटक करुन आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी अर्जदार वकिलांनी केलाय.

या निर्णयानंतर कोकाटेंनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र कोर्टाने कोकाटेंच्या अटकपूर्व जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे कोकाटेंच्या अडचणीत आणखीच वाढ झालीय. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी मात्र कायद्यानुसार निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. हे असं असलं तरी ज्या प्रकरणामुळे कोकाटेंचा पाय खोलात गेलाय ते प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात.

काय आहे प्रकरण?

  • 1995 मध्ये कॅनडा कॉर्नर परिसरात नियमबाह्य घरं लाटल्याचा आरोप

  • अल्प उत्पन्न गटातील घरं बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटल्याचा ठपका

  • कोकाटे बंधूंनी सीएम कोट्यातून नियमबाह्य पद्धतीने घरं मिळवले

  • न्यायालयानं पुराव्यानिशी कोकाटे बंधूंना दोषी ठरवलं

  • जिल्हा न्यायालयाकडून कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार दंड

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदाराला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर आमदारकी रद्द होणं आवश्यक असतं. मात्र कोकाटेंना दोषी ठरवल्यानंतर 24 तास उलटूनही त्यांची आमदारकी रद्द झाली नाही.त्यामुळे जो न्याय काँग्रेस नेते सुनील केदार यांना लावण्यात आला होता. तो न्याय कोकाटेंना कधी लावण्यात येणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT