Shivsena  Saam TV
महाराष्ट्र

Shivsena : धक्कादायक! आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल; दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Sheetal Mhatre : शितल म्हात्रे यांनी देखील यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला. यामुळे आमदार प्रकाश सुर्वे यांचे समर्थक आक्रमक झालेत. शितल म्हात्रे यांनी देखील यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. (Political News)

प्रकाश सुर्वे यांनी काल रात्रभर दहिसर पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. तसेच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांनी मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. (Political News)

काल बोरिवली दहिसर भागात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान खुल्या जीपमधून जात असतानाचा आमदार प्रकाश सुर्वे आणि शितल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ विरोधकांकडून सोशल माध्यमात अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला.

दरम्यान, 'राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?'असं म्हणत शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे गटाला उद्ध्वस्त गट असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Benefits OF Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दही कसं फायदेशीर आहे?

GK: प्लास्टिक स्टूल आणि खुर्च्यांवर छिद्रं का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Maharashtra Live News Update: शेळ्या चारणाऱ्या युवकाचा विद्युत वहिनीला धक्का लागून मृत्यू

फडणवीस, शिंदे अन् पवार हे 'फेव्हिकॉल का मजबूत जोड'; मंत्री प्रताप सरनाईक असं का म्हणाले?

बोटचालक क्षणात गेला वाहून…; बीडच्या पुरात घडली हृदयद्रावक घटना|VIDEO

SCROLL FOR NEXT