NCP POLITICAL EARTHQUAKE? 22 AJIT PAWAR CAMP MLAS REPORTEDLY MEET SHARAD PAWAR saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय भूकंप होणार? अजित पवार गटातील 22 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली

Ajit Pawar Group 22 Mla Meet Sharad Pawar: अजित पवार गटातील तब्बल २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Bharat Jadhav

  • अजित पवार गटातील २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा

  • राज्यातील राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे.

  • शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही पक्ष एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट केले.

अजित पवार गटातील तब्बल २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जातेय. दोन-तीन दिवसापूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चानुसार अजित पवार गटातील तब्बल २२ आमदार शरद पवार यांना भेटले आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठकाही झाली होती. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे २२ ते २३ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे त्यामुळे आता राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झालंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील काही आमदार सध्या राजकीय भविष्याबाबत साशंक आहेत. पक्षातील नेतृत्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यावरून नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातंय. जे आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक नाहीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच इच्छूक आहेत. त्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी शरद पवार यांची भेटही घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा कोणते आमदार सहभागी होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही. इतकेच नाही तर अजित पवार गटाकडून याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये. दरम्यान आज शरद पवार गटाची बैठक झाली या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली.आजच्या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करुन मोठ्या उमेदीनं पुढे जायचं आहे पक्षात पूर्ण ताकतीनं पक्ष उभा करण्याची चर्चा झाली. आता दोन्ही पक्षांच्या विलिनिकरणाचा विषय संपलेला आहे.

आमचा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात लढणार आहे, आम्ही वेगवेगळे मुद्दे हाताळू. आमविआ म्हणून १५ आँगस्ट नंतर राज्यात दौरे करणार आहोत,असं शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली. आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली, यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना 22 आमदारांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले,

‘आमच्याकडे असा प्रस्ताव आलेला नाही, मात्र प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू. शरद पवार यांच्या नेतृत्वात त्यांना काम करायचे असेल तर आम्ही नक्की विचार करू.’
शशिकांत शिंदे,प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; २० वर्षीय भारतीय जवानाचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा

Hair Care: केस गळणे कमी करुन नॅचरल शायनी आणि घनदाट केस पाहिजेत? मग, केसावर लावा हा घरगुती हेअर स्प्रे

Jamun Side Effects: कोणत्या २ रुग्णांनी जांभूळ खाऊ नयेत? कारण वाचून बसेल धक्का

BJP Leader Death: भाजपच्या दिग्गज नेत्याचा संशयास्पद मृत्यू, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

Maharashtra News Live Update : शिवराज मोटेगावकराचे नवनवीन काळे कारनामे समोर, लातूरमध्ये अनधिकृत 8 भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहितीसमोर

SCROLL FOR NEXT