Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : आयाराम गयारामांचे किती लाड पुरवणार? ; सदाभाऊ खोत यांचा महायुतीला घरचा आहेर

Sadabhau Khot On Mahayuti : मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही योग्य स्थान मिळालं पाहिजे, अन्यथा नाराजी पसरेल, तसंच कआयाराम गयारामांचे किती लाड पुरवायचे याचा अंदाज आला असेल, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना ४ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांच वेध लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष आतापासूनच निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्याच अनुषंगाने राज्यमंत्रिमंडळाचा विस्तारही होण्याची शक्यता आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घटक पक्षांनाही योग्य स्थान द्या, अन्यथा नाराजी पसरेल, असा सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत आपल्याला जाणवलं की, आयाराम गयाराम यांचे लाड किती पुरवावेत. त्यामुळे यालाही कुठेतरी मर्यादा आल्या पाहिजेत, निर्बंध असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच प्रतिबिंब कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसलं पाहिजे. तसंच महायुतीतील घटक पक्षांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये योग्य सन्मान दिला पाहिजे. आमच्याही कार्यकर्त्यांमुध्ये नैराश्याचं वातावरण आहे. ते होऊ नये, याची काळजी महायुतीने घेतली पाहिजे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

Local Body Election: मत नाही तर निधी नाही; नेत्यांची गुंडगिरी, मतदारांना धमक्या?

Gajkesari Rajyog: 12 वर्षांनंतर बनणार गजकेसरी राजयोग; चंद्र-गुरूच्या कृपेने मिळणार भरघोस पैसा

SCROLL FOR NEXT