Maharashtra Politics 2024  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : नाशिकची जागा जिव्हारी लागली, छगन भुजबळ स्वगृही परतणार का? विद्या चव्हाण म्हणाल्या...

Sandeep Gawade

नाशिक लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकची जागा भुजबळांना लढवायची होती, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांच्या जिव्हारी लागलं असेल. त्यावरून ते नाराज असतील असं वाटतं. मात्र ते स्वगृही परतानार का? हे तेच स्पष्ट सांगू शकतील असं विद्या चव्हान यांनी म्हटलं आहे.

कोस्टल रोडला काही ठिकाणी गळती लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वाहणी करून मुख्य मार्गाला कोणताही धोका नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे. पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर कोस्टड रोड वाहून जाऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी ती संकल्पना होती. मात्र यांनी केवळ श्रेय घेण्यासाठी घाईघाईने उद्धाटन केलं. मोठे टेक्निशीयन बोलवून याची पाहणी व्हायला हवी. जोपर्यंत खात्री पटत नाही. तोपर्यंत हा मार्ग सुरू करता कामा नये आणि जर काही दुर्घटना घडली तर त्याला सरकार जबाबदार असेल, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT