NDA Party Member Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024: महायुतीत ठिणगी पडणार? : चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा

Mahayuti Vidhan Sabha Seat Allocation: राष्ट्रवादी अजित पवार गटाने चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे विधासभेच्या जागावाटपावेळी महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात अजित पवार गटाचा मोठ वाटा आहे. अजित पवार गटाची ताकदही मोठी आहे. मात्र चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत सध्या भाजपकडे आहेत. भाजपचे दोन विद्यमान आमदार या मतदारसंघात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला म्हणावं तसं यश आलेलं नाही. मात्र विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनी या विधासभा निवडणुकीसाठी आतापासूनच दंड थोपटले आहेत. विधानसभेत लोकसभेपेक्षा एकदम वेगळं चित्र असेल, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पिंपरी चिंचवड शहरापासून त्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरीत अण्णा बनसोडे अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विद्यमान आमदार आहेत. तर मावळात सुनील शेळके आमदार आहेत. मात्र महायुतीत भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ भाजपकडे आहेत. त्यांचे विद्यमान खासदार आहेत. तरीही अजित पवार गटाने यावर दावा केल्यामुळे जागा वाटपावेळी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने जरी भोसरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रावर दावा केला असला तरी या दोन्ही जागा भाजप कडेच आहेत आणि भाजपकडेच राहतील असा विश्वास पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. सध्या ज्या जागांवर ज्या पक्षाचा आमदार आहे. त्या जागा महायुती त्याच पक्षाकडे असतील असा फॉर्मुला महायुती ठरला आहे. आणि मी स्वतः चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशी इच्छा देखील शंकर जगताप यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT