Manasvi Choudhary
हिवाळ्यात केस कोरडे होतात यामुळे केसांतील ओलावा कमी होतो यासाठी तुम्ही काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो करायच्या आहेत.
हिवाळ्यात केस धुण्याआधी १ ते २ तास आधी केसांना कोमट तेल लावून मालिश करा यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.
हिवाळ्यात जर तुमचे केस खूप जास्त कोरडे असतील, तर रात्री तेल लावून हलक्या हाताने मसाज करा आणि सकाळी केस धुवा.
हिवाळ्यात सकाळी लवकर किंवा संध्याकाळी खूप थंडी असते. अशा वेळी दुपारी जेव्हा ऊन असते, तेव्हा तेल लावणे फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात खोबरेल तेल गोठते. त्यामुळे तेल कोमट करून लावा कोमट तेल केसांच्या मुळापर्यंत पोहचते.
थंडीत केस धुतल्यानंतर लगेचच तेल लावू नका यामुळे हवेतील धूळ केसांवर बसते केस चिकट आणि खराब होतात.
जर तुमच्या केसात कोंडा असेल, तर तेलात थोडे लिंबू पिळून ते तेल कोमट करून लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.