Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा' बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

Jalna News : जालना महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. या प्रवेशामुळे जालन्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत आहेत.

Alisha Khedekar

जालना महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शिंदे गटात प्रवेश करणार

आंबेकर हे गेली तीन दशकांहून अधिक काळ उद्धव ठाकरे गटाशी जोडलेले होते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘धनुष्यबाण’ हाती घेणार

या प्रवेशामुळे जालना राजकारणातील शिवसेनेची समीकरणे बदलणार आहेत

जालन्यात महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आज समर्थकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर धनुष्यबाण हाती घेणार आहे. यामुळे जालन्यात महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात नाराजी पाहायला मिळत आहे.

आंबेकर गेली तीन ते साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ ते उबाठा गटाशी एकनिष्ठ आहेत. पक्षात फूट पडल्यावर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याऐवजी उध्दव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन विद्यार्थी संसदेच्या राजकारणापासून पुढील काळात आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत असणारे आंबेकर शिवसेनेतील फुटीनंतर मात्र मशाल हातात घेऊनच थांबले. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची साथ सोडून आता ते राजकीय दृष्ट्या पुन्हा खोतकर यांच्यासोबत एका पक्षात येणार आहेत.

आंबेकर यांचे नेतृत्व स्थानिक नगरपरिष‌देच्या राज‌कारणातून पुढे आले. जवळपास ‌वीस वर्ष नगर परिषद सदस्य होते. दोन वेळेस ते नगराध्यक्ष होते. यापैकी एकदा ते प्रत्यक्ष निवडणुकीतून विजयी झाले. २०१९ पासून ते उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. शिवसेनेचे जालना शहरप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि जालना बाजार समितीचे उपाध्यक्ष, राज्य बियाणे महामंडळाचे संचालक इत्यादी पदांवर राहीलेले आंबेकर शैक्षणिक , क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहेत.

जालना विधानसभेचे पाच वेळेस प्रतिनिधित्व करणारे अर्जुन खोतकर यांचे कॉलेजपासूनचे मित्र अशी आंबेकर यांची ओळख आहे. कांही दिवसांपूर्वी त्यांनी खोतकर यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्हा दौऱ्यावर असताना भास्कर आंबेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नांना यश आलं असून या प्रवेशामुळे शहरासह ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.तसेच जालना शहर महानगरपालिका निवडणूक समीकरण देखील बदलणार असल्याचं बोलल जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली स्फोटाचे महाराष्ट्रात कनेक्शन? पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी, ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार

Mumbai News: सेप्टिक टँक साफ करताना मुंबईत मोठी दुर्घटना, एका कामगाराचा मृत्यू; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

IPhone Camera : कोणत्याही आयफोनला डीएसएलआर कॅमेरामध्ये बदलू शकता, जाणून घ्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Girija Oak: निळ्या साडीत मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर घातलाय राडा, नॅशनल क्रश म्हणून का झाली प्रसिद्ध?

SCROLL FOR NEXT