Dharashiv Politics: Four Thackeray Corporators Join Shinde Sena AI Image
महाराष्ट्र

Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ४ नेत्यांचा शिंदेसेनेत प्रवेश, राजकारणात खळबळ

Maharashtra Political News : धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाला मोठा धक्का. ४ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

Alisha Khedekar

  • धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला

  • प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली उंबरे आणि केसरबाई करवर यांचा पक्षप्रवेश

  • या प्रवेशानंतर ठाकरे गटाचे नगरपरिषदेत केवळ तीन नगरसेवक उरले

  • खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव नगरपरिषदेत ठाकरेसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या ४ नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे गटाचे नगरसेवक प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली उंबरे आणि केसरबाई करवर यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. या चार नगरसेवकांच्या प्रवेशामुळे धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाचे आता केवळ तीन नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, हे चारही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, प्रवेश भाजपऐवजी शिवसेना शिंदे गटात झाल्याने राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या राजकीय घडामोडीला स्थानिक पातळीवर ‘ऑपरेशन टायगर’च्या यशाशी जोडले जात आहे.

दरम्यान, कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता धाराशिवमधील चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी काळात धाराशिव नगरपरिषदेत या पक्षांतराचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची नगरपरिषदेतील ताकद वाढली असून आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT